Wednesday, 17 October 2018

मच्छिमार अपघात विमा योजनाचे सदस्य होण्याचे आवाहन


       जळगाव, दि. 17 – मत्सव्यवसाय विभागातर्फे राज्यातील मच्छिमारांना अपघाताने किंवा प्रत्यक्ष मासेमारी करतांना मृत झाल्यास मच्छिमारांच्या वारसास आर्थिक लाभ देण्यात येतो. जे मच्छिमार किंवा व्यक्ती नजिकच्या जलाशयात मासेमारी करतात किंवा त्यांचे मासेमारी हे उपजीविकेचे साधन आहे. त्यांनी आपल्या नजिकच्या मच्छिमार संस्थेत नाव नोंदवून संस्थेचे सभासद होणे अनिवार्य राहील. जळगाव जिल्हयातील प्रत्येक संस्थेने उपरोक्त अपघात गट विमा योजनेची 14 रकान्यातील विहिती नमुन्यतील माहिती या कार्यालयास तात्काळ देणे बंधनकारक आहे. याविषयी सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय, मंडोरे बिल्डिंग दुसरा मजला        डॉ. आंबेडकर मार्केट जवळ जळगाव, दुरध्वनी क्र. 0257-2455955 यांनी कळविले आहे. परंतु त्यास प्रतिसाद अल्प आहे ज्या व्यक्ती / मच्छिमार संस्थेचे सभासद नसतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment