जळगाव, दि.5:- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता
प्राप्त अनुदानित / विना अनुदानित / कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा,
कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग
शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2018-19 अनुदान प्राप्त
करण्यासाठी जळगाव जिल्हयातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी शासन निर्णय क्र..
अविवि-2015/ प्र.क्र. 80/ 15/का.6/ दि. 7 ऑक्टोबर 2015 च्या तरतूदरीनुसार विहित नमुन्यात
अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दिनांक 30 ऑक्टोबर
2018 पर्यंत सादर करण्यास अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.
विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
शासन निर्णय क्र.
अविवि-2015/प्र.क्र.80/1/का.6/दि. 7 ऑक्टोबर 2015 अर्जाच नमुना व आवश्यक
कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे उच्च स्तरीय निवडसमिती, तथा जिल्हा नियोजन
अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment