जळगाव दि. 29 :- प्रादेशिक पर्यटन
विकास निधी अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत कोथळी ता. मुक्ताईनगर
येथे 50 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ॲम्युझमेंट पार्कचे भूमिपुजन
राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न
झाले.
यावेळी राज्याचे सामाजिक न्याय
राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षाताई खडसे, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव
खडसे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, जि. प. उपाध्यक्ष नंदकुमार
महाजन आदी उपस्थित होते.
कोथळी परिसराच्या विकासासाठी 100 कोटी
रुपयांच्या विकास आरखड्यास मंजूरी मिळाली आहे. याकरिता
ग्रामविकास विकास विभागाने 25 कोटी रूपये मंजूर केले असून 9 कोटी रुपयांचा निधी
उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून याठिकाणी विविध विकासकामे करण्यात आली
आहे. तर अनेक कामे सुरु आहेत. तसेच पर्यटन विभागानेही 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
करून दिला आहे. या निधीतून याठिकाणी
पर्यटन विभागामार्फत ॲम्युझमेंट पार्क बांधण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ
मंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर संत मुक्ताईनगर मंदिर परिसरात
बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या कोनशिलेचे अनावरण करून मंत्री महोदयांच्या हस्ते
उद्घाटन करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment