Friday, 12 October 2018

एम. जे. कॉलेज पोस्ट कार्यालयासाठी जागेची आवश्यकता

     जळगाव, दि. 12 -  एम. जे. कॉलेज पोस्ट कार्यालयासाठी रामानंद नगर, यशवंत नगर, शिवराम नगर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वती नगर, पटेल नगर, टेलीफोन नगर, आनंद हौसिंग सोसायटी, सदगुरु समर्थ हौसिंग सोसायटी, गजानन हौसिंग सोसायटी, सुयोग कॉलनी, आराधना कॉलनी  या परिसरात पंधराशे स्क्वेअर फूट जागा पोस्ट कार्यालयासाठी व 450 स्क्वेअर फुट जागा निवासस्थानासाठी सर्व प्राथमिक सोयींनी युक्त ( स्वतंत्र स्वच्छता गृह, इलेक्ट्रिकल मीटर, नळाचे कनेक्शन) अशी जागा भाडे तत्वावर करारनामा पध्दतीने आवश्यक आहे.
     इच्छूक व्यक्तींनी डाक अधिक्षक कार्यालय, जळगाव यांचेशी 0257-2224288 या दूरध्वनीवर  संपर्क करुन विहित नमुन्यतील अर्ज भरुन द्यावा. असे आवाहन डाक अधिक्षक, जळगव यांनी केले आहे. 
                                                                             ०००

No comments:

Post a Comment