जळगाव, दि. 12 - फैजपुर उपविभागातील रावेर व यावल तालुक्यातील मोठे, मध्यम, व लघु प्रकल्पातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षित असुन अनधिकृत पाणी उपसा करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. असा इशारा डॉ. अजित थोरबोले, उपविभागीय अधिकारी, फैजपूर भाग, फैजपूर यांनी दिला आहे.
डॉ. थोरबोले यांनी फैजपुर उपविभागातील सर्व नागरिकांना सुचित केले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता रावेर व यावल तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान हे अत्यंत कमी प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे पुढील काळात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी फैजपुर महसुल उपविभागातील रावेर व यावल येथील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठे हे पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे पाणीसाठे असणा-या ठिकाणी अनधिकृत पाणी उपसा करण्यासाठी सध्या ज्या इसमांनी इलेक्ट्रीक पंप, डिझेलपंप अथवा इतर पाणी उपसा करणारी साधने ठेवुन कार्यान्वीत केलेली आहेत व त्यांचा अनधिकृत पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे, त्या सर्व संबंधितांना त्यांचे इलेक्ट्रीक पंप, डिझेल पंप अथवा इतर पाणी उपसा करणारी साधने दि. 15 ऑक्टोबर, 2018 पर्यंत कुठल्याही परिस्थितीत स्वत:हून काढून टाकावीत. अन्यथा, त्यांचेविरूध्द आरक्षीत केलेल्या पाणी साठ्याची चोरी विरुध्द टंचाई संदर्भात असलेल्या कायद्यांतर्गत संबंधित पाणी उपसा करणारी साधने जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येतील असेही डॉ. थोरबोले यांनी कळविले आहे.
000

No comments:
Post a Comment