Tuesday, 23 October 2018

रावेर तालुक्यात आज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या दारी


       जळगाव, दि. 23 - निवडणूक आयोगाकडील अधिसुचनेप्रमाणे संपुर्ण राज्यात 1 सप्टेंबर 2018 ते 31 ऑक्टोंबर 2018 या कालावधीमध्ये मतदान नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या  कार्यक्रमाअंतर्गत ज्या नागरिकांची मतदार नोंदणी झालेली नसेल अशा पात्र नागरिकांची नोंदणी करणे,
MT Series Voter तसेच ज्या मतदार यांचे मतदार यादीत फोटो नाहीत अशा मतदारांचे कलर फोटो गोळा करणे तसेच दिव्यांग मतदार यांचा शोध घेवून ज्यांचे नांव मतदार यादीत नाही त्यांची प्राधान्याने नोंदणी करणे इत्यादी कामे मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहे.
       रावेर विधानसभा मतदार संघामध्ये दि. 01/01/2019 या अहर्ता दिनांकावर 18 वर्ष पुर्ण होणा-या मतदारांची नोंदणी आयोगाने दिलेल्या 31 ऑक्टोंबर 2018 या अंतिम तारखेच्या आत होणे गरजेचे आहे. याकरीता वयाची 18 वर्ष पुर्ण करणा-या नागरिकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी करणेसाठी 24/10/2018 या दिवशी रावेर तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट मोहिमअंतर्गत सकाळी 9.00 वाजेपासून तर सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आपल्या दारी येणार आहे. रावेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपविभागीय अधिकारी, फैजपूर तथा मतदान नोंदणी अधिकारी रावेर विधानसभा मतदार संघ यांचेतर्फे करण्यात येत आहे.
फार्म भरणेकामी आवश्यक कागदपत्राची यादी -
वयाचे पुरावे - मार्कशीट 10 वी, 8 वी, 5 वी., जन्माचा दाखला,  भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड (या पैकी कुठलाही एक)
रहिवास पुरावे - रेशनकार्ड, टेलीफोन बिल, लाईट बिल, पाण्याचे बिल, गॅस कनेक्शन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, भारतीय पासपोर्ट, बँक पासबुक (Current), इन्कम टॅक्स आर्डर. एक पासपोर्ट साईज फोटो. घरातील एका व्यक्तीचे मतदान कार्ड आदि द्यावेत. असे आवाहन डॉ.अजीत थोरबोले, उपविभागीय अधिकारी फैजपूर, तथा मतदान नोंदणी अधिकारी, 011 रावेर विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment