Tuesday, 23 October 2018

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना एकवेळ समझोता योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

    जळगाव, दि. 23 -  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -2017 या योजने अंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (One Time Settlement) योजनेखाली पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी दिनांक 30 सप्टेबर 2018 पर्यंत होता. या कालावधीस दिनांक 29 सप्टेबर 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आली असून सदरची मुदतवाढ 31 डिसेंबर, 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.
     जिल्ह्यातील सर्व पात्र थकबाकीदार असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (One Time Settlement) योजनेखाली पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी दिनांक 1 ऑक्टोबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत वाढविण्यांत आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतक-यांना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या कार्यालयामार्फत आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या हिश्याची रक्कम वरील मुदतीत बँकामध्ये भरुन सदर योजनेचा लाभ घ्यावा. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                           ०००

No comments:

Post a Comment