जळगाव, दि. 4- सर्व आवेष्टित वस्तू उत्पादक / पॅकर/ रिपॅकर यांनी
वैधमापन शास्त्र ( आवेष्टित वस्तु) नियम 2011 नुसार नोंदणी करुण घेणे आवश्यक आहे.
आवेष्टित वस्तु विहीत मुदतीत नोंदणी न
केल्यास शिक्षापात्राची तरतुद असुन जळगाव जिल्हयातील आवेष्टित वस्तुचे / उत्पादक /
पॅकर/ रिपॅकर यांच्या नोंदणी बाबत विशेष तपासणी मोहीम आयोजित करण्यात येत आहे.
त्यामुळे सर्व संबंधितांनी विहीत मुदतीत नोंदणी करुन घ्यावी.
आवेष्टित वस्तुंची नोंदणीकरण्यासाठी मंत्री
कक्षाच्या संकेत स्थळावर स्वतंत्र portal ची व्यवस्था केलेली आहे. त्याकरिता http://www.maitri.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्या आस्थापनांची
नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन सहाय्यक
नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव
श्री.
रा.भ.बांगर, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
०००
No comments:
Post a Comment