Monday, 1 October 2018

हायब्रीड ॲन्युटी अतंर्गत होणारी रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



             जळगाव दि. 1 - जिल्ह्यात हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत तयार करण्यात येणारे रस्ते हे राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे गुणवत्तापूर्ण करण्यात येवून येत्या दीड वर्षात पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सार्वजनिक बांधकाम मंडळाकडून करण्यात येणाऱ्या चार कामांचे प्रात्यनिधिक स्वरुपात उद्घाटन मुसळी फाटा, ता. धरणगाव येथे राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर खासदार ए. टी. नाना पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार श्रीमती  स्मिताताई वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार किशोर दराडे, आमदार सतिष पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिकचे मुख्य अभियंता हेमंत एस. पगारे आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या 10 वर्षात वेगवेगळया कारणांमुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली. त्याप्रमाणात रस्ते मोठे झाले नाहीत. तसेच जडवाहनांसाठी हे रस्ते नव्हते. म्हणून हे रस्ते लवकर खराब झाले. दरवर्षी रस्त्यांचे खड्डे भरण्याचे काम करावे लागत होते.  मात्र यापुढे जिल्ह्यात तयार करण्यात येणारे रस्ते हे राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे गुणवत्तापूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्ते चांगले असतील तर शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजारात आणता येईल. म्हणून ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. येत्या 3 ते 4 वर्षात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन विकासाचा आराखडा पूर्ण करण्यात येईल. शासन करीत असलेल्या कामात लोकांनी सहकार्य करुन कामात लक्ष घातल्यास ती कामे गुणवत्तापूर्ण होतील. असेही त्यांनी सांगितले.
आपल्या प्रास्तविकात मुख्य अभियंता हेमंत पगारे यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण आठ रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे.  यापैकी 4 पॅकेजची निविदाची कार्यवाही पूर्ण झाली असून  एक निवीदा  शासनाकडे पाठविण्यात आली आहे तर एका निवीदेला नुकतीच मंजूरी मिळाली आहे. येत्या एक महिन्यात रस्त्यांच्या कामांना सुरवात होणार आहे. ही सर्व कामे उच्च दर्जांची, गुणवत्ता राखून करण्यात येणार आहे. ही कामे सुरु असतांना लोकांनी सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.
प्रातिनिधीक स्वरुपात उद्घाटन करण्यात आलेली कामे याप्रमाणे. मुसळीफाटा धरणगाव अमळनेर बेटावद रस्ता, रा. मा. 6, कि. मी. 0/00 ते 61/00 रस्त्यांची सुधारणा करणे, ( मुसळी फाटा ते जिल्हा हद्द ब्राम्हणे ) अंदाजित रक्कम रुपये 139.55 कोटी, राज्यसिमा विटवा भुसावळ जामनेर मोताळा पिंपळगाव राजा खामगाव रस्ता, रा. मा. 44 कि. मी. 72/200 ते 117/00 ( भाग जामनेर ते मोताळा ) व सावखेडा फाटा धरणगावएरंडोल म्हसावद नेरी जामनेर रस्ता, रा. 41 कि. 24/700 ते 65/700 ( भाग एरंडोल ते नेरी दिग) जि. जळगाव, अंदाजित किंमत रुपये 186.58 कोटी रुपये,  येवला नांदगाव चाळीसगाव भडगाव रस्ता रा. मा. 25 कि. मी. 65/600 ते 115/600 ( भाग सोयगाव ते बहाळ ) ता. चाळीसगाव व चांदवड मनमाडचाळीसगाव नागद अजिंठा रस्ता, रा. मा. 24 कि. मी. 96/240 ते 111/400 ( भाग चाळीसगाव ते औरंगाबाद जिल्हा हद्द) अंदाजित किंमत रुपये 141.50 कोटी,  येवला नांदगाव चाळीसगाव भडगाव रस्ता रा. मा. 25 कि. मी. 115/600 ते 171/600      (भाग बहाळ ते एरंडोल ) अंदाजित किंमत रुपये 139.64 कोटी.
000

No comments:

Post a Comment