Wednesday, 17 October 2018

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दसऱ्याच्या दिवशीही सुरु


     जळगाव, दि. 17 :- सर्व वाहन धारक / वाहन प्रतिनिधी यांना आवाहन करण्यात येते की, गुरुवार दिनांक 18 ऑक्टोबर दस-याच्या सणाच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्याकारणाने वाहन धारकांनी नविन वाहन खरेदी केल्यानंतर त्या नविन वाहनाचा कर भरणा व क्रमांक घेणेबाबत गैरसोय होवू नये यासाठी संदर्भाकित परिपत्रकान्वये दि. 18 ऑक्टेबर सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. जेणेकरुन, वाहन धारक सणाच्या मुहूर्तावर नविन वाहन खरेदी करतात, त्यांना कर भरणा व क्रमांक देणे सोयीचे होईल याबाबत सर्व वाहन धारक व वाहन प्रतिनिधी यांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव जयंत पाटील, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment