Tuesday, 16 October 2018

आपत्ती व्यवस्थापन व जि.प.शिक्षण विभाग (माध्य) आयोजित जिल्हास्तरीय खुली चित्रकला स्पर्धा


     


       जळगाव, दि. 16 –जळगाव येथील गांधी उद्यान जिल्हास्तरीय खुली चित्रकला स्पर्धेचे आयोजन आपत्ती व्यवस्थापन विभाग व जि.प. शिक्षण विभाग (माध्य) यांचे तर्फे महात्मागांधी उद्यान येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जळगाव जिल्हयातील विविध माध्यमिक शाळांमधुन 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. केरळ येथील पूरआपत्ती व त्यावर केले गेलेले उपाययोजना, मदत कार्य या विषयावर विद्यार्थ्यांना चित्र काढण्यास सांगण्यात आली या स्पर्धेत इ. 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम गट तर इ. 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्दितीय गट या प्रमाणे विभाजन करण्यात आले होते.
        विद्यार्थ्यांनी वरील विषयांवर जलरंगात क्रेऑन्स कलर अशा विविध माध्यमाना सुंदर चित्रे स्पर्धेच्या माध्यमातुन तयार केली या र्स्प्धेसाठी आयोजकाकडून मोठया प्रमाणात बक्षीस योजना ठेवण्यात आली होती. त्यात प्रथम बक्षीस रोख रुपये 5000/-, व्दितीय रुपये -3000/-, तृतिय रुपये -1000/- व उतेजनार्थ 2 बक्षीस रुपये 500/- प्रमाणे व प्रमाणपत्र या प्रमाणात दोन्ही गटात देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाचे प्रमुख जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे यांनी पूर्ण केली.  स्पर्धा यशस्वी ते साठी कलासघाचे राज्य चिटणीस एस.डी. भिरुड जिल्हा संघाचे अध्यक्ष एन.ओ. चौधरी, सचिव अरुण सपकाळे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन व कला शिक्षक – सुहास चौधरी, अजय पाटील, दिनेश बाविस्कर, निलेश कुमावत, सतिष भोळे, शंकर वाणी, हरीष तळेले, दिनेशपाटील, गोपाल भारुळे, विकास चौधरी, राजेश पवार, योजना चौधरी, मिनाक्षी कोल्हे, भरत चौधरी, दुर्गाछास नेरकर, गिरिष भारंबे, प्रकाश अढळकर, संजय पिंगळे, गजानन किनंगे, किर्ती कुमार शेलकर, श्याम कुमावत, नितीन सोनवणे, पंकज नागपुरे, राजु बाविस्कर, शेख हाफिज, शेख शरिफ, यांनी परिश्रम घेतले. यास सोबत परिसरात आपत्ती व्यवस्थापनाचे विविध प्रात्यक्षिके व पोस्टरर्सचे प्रदर्शन दाखविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमदार सर्वश्री. राजूमामा भोळे, चंदूभाई पटेल, महापौर सौ. सिमाताई भोळे (म.न.पा), निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार अमोल निकम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रावळ, चौबे हे उपस्थित होते.सदर करर्यक्रमांचे सुत्रसंचालन श्री दिनेश बाविस्कर यांनी केले.
०००

No comments:

Post a Comment