जळगाव, दि. 3- पशुसंवर्धन विभागामार्फत
जिल्हयात 20 वी पशुगणना -2018 कामकाज सुरु झालेले असून ही पशुगणना टॅबलेटसवर होणार
आहे. त्याकरिता जिल्हयातील पशुपालकांनी प्रगणक, पर्यवेक्षक व छाननी अधकारी यांना आपल्याकडे असलेल्या पशुधनाची संपूर्ण
माहिती देण्यात यावी जेणेकरुन केंद्र शासन व पशुसंवर्धन विभागामार्फत होणारी 20 वी पशुगणनाचे काम सुरळीत व यशस्वीरित्या पार
पाडणे शक्य होईल. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगाव यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment