Tuesday, 16 October 2018

सैन्य भरती मेळावा पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न




         जळगाव दि. 16 – जिल्हयात 20 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत होणा-या सैन्य भरती मेळावा पूर्व तयारी आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी संपन्न झाली. औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार व परभणी अशा एकूण 9 जिल्ह्यातील उमेदवार सहभागी होणार असून 4 नोव्हेंबर ही भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख आहे. या भरती मेळाव्यात, सोल्जर जनरल (GD) सोल्जर टेकनिकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन) दारुगोळा निरिक्षक), सोलजर टेक्निकल (नर्सिग असिस्टंट) सोल्जर टेक्निकल (नर्सिग असस्टिंट व्हेटरनेटी) सोल्जर क्लर्क/ स्टोअर कीपर टेलिकल / इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सोल्जर टे्रडसमन या पदांचा समावेश आहे. आज अखेर 33 हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली असून यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झाली. त्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील उमेदवारीची सर्वाधिक नोंद आहे. या भरतीस समारे 50 हजार विद्यार्थी उपस्थित राहातील असा प्राथमिक अंदाज असल्याने बैठकीत चर्चेले गेले. अप्पर जिल्हाधिकारी श्री.गाडीलकर यांनी भरती मेळाव्यासाठी तयार करावयाच्या सुविधाचा बाबनिहाय आढावा घेवून संबंधित यंत्रणेला सूचित केले. यात प्रामुख्याने जिल्हा क्रीडा विभागांने जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस विभागातर्फे पोलीस कवायत मैदान व इतर सुविधा उपलब्ध करुन  देणे, पोलिस बंदोबस्त, महानगर पालिकातर्फे फिरते स्वच्छतागृहे पिण्याचे पाणी सफाई कामगार, सार्वजनिक बांधकाम विभाग रोड रोलर, पाण्याचे टँकर विदयूत विभागाकडून विदयूत पुरवठा, आरोग्य सेवा रुग्णवाहिका डॉक्टर्स भरतीसाठी येणा-या मुलांना निवारा भोजन व्यवस्थेसाठी स्थानिक सेवाभावी संस्थांची मदत घेण्याबाबत ही या बैठकीत चर्चा झाली. रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे हेल्थबुथ उभारणे इत्यादी बाबीवर चर्चा होवून जबाबदारी निश्चित करण्यात आली.
            प्रारंभी औरंगाबाद सैन्यभरती कार्यालयाचे भरती संचालक कर्नल एस.एस. कालीया यांनी संगणकीय सादरीकरणाव्दारे भरती प्रक्रीयाबाबत उपस्थितीना माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित मदतीची माहिती दिली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री. आर. पी. पाटील, उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.अकलाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, पोलीस निरीक्षक रजेसिंग चंदेल, उपायुक्त श्री. कहार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेप्ट.कमांडर मिनल मधु पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सरला पाटील आदि अधिकारी उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment