जळगाव,
दि. 12 - संयुक्त राष्ट्र संघने घोषित केलयानुसार 13 ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण
दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा कार्यकारी अध्यक्ष, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिली आहे.
या
सप्ताहानिमित्त पोलीस विभागातर्फे गर्दीच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारा ऑडिओ, व्हीडीओद्वारे
जनजागृ्रती करण्यात येणार आहे. तसेच महात्मा गांधी उद्यान, जळगाव, तहसील कार्यालय,
भुसावळ, राष्ट्रीय महाविद्यालय, चाळीसगाव, साने गुरुजी विद्यालय, मैदार, अमळनेर येथे
आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शोध व बचाव साहित्याचे खुले प्रदर्शन मांडण्यात येणार
आहे. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी यांचेमार्फत महात्मा गांधी उद्यानात केरळ येथील पुर
एक नैसर्गिक आपत्ती यावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
वन्यजीव
संरक्षण संसथेमार्फत यावल, रावेर, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर या तालुक्यातील
नदीकाठच्या 50 गावांमध्ये गावसभांचे आयोजन करुन गावस्तरीय आराखडे तयार करण्यात येणार
असून या गावांमध्ये पथनाट्याद्वासरे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहितीही श्री.
मुंडके यांनी दिली आहे.
000
No comments:
Post a Comment