Tuesday, 16 October 2018

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2019-2020 प्रक्रिया सुरु अर्ज करण्याचे आवाहन


      जळगाव, दि. 16 -     सातारा सैनिक स्कूल येथे इयत्ता 6 वी आणि 9 वी साठी वर्ष 2019-20 सत्राच्या परिक्षेसाठी पात्र विदयार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेश परीक्षा दिनांक 6 जानेवारी 2019 (रविवार) रोजी घेण्यात येईल प्रवेश परीक्षा ओ.एम.आर पध्दतीने घेतली जाईल ज्यात उत्तरे बहुपर्यायी असतील शाळेचे माहितीपत्रक वेबसाईटवर  उपलब्ध आहे.
            वयोमर्यादा  पध्दती :- इयत्ता – 6 वी प्रवेशासाठी  वयोमयोदा – विद्यार्थी 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2009 (दोन्ही दिवस धरुन या दरम्यान जन्मलेला असावा, निवड पध्दती 1. लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी परीक्षा - अंदाजे प्रवेश - त्रेसष्ट, इयत्ता 9 वी विद्यार्थी 01 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2006 (दोन्ही दिवस धरुन ) या दरम्यान जन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 8 वी मध्ये शिकत असावा.  प्रवेश फक्त गुणवत्तेवरच दिला जाईल – 07  अंदाजे जागांची संख्या शाळेतून पास आऊट व सोडून जाणा-या संख्येनुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.
            अर्ज कसा करावा:- विद्यार्थी प्रवेश परीक्षा फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरु शकतात. प्रवेश परिक्षा अर्ज  8 ऑक्टोबर 2018 ते 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत sainkschooladmisson.in किंवा  www.sainiksatara.org  वेबसाईटवर उपलब्घ असतील. ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 01 डिसेंबर 2018 प्रवेश परीक्षा नोंदणी शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. ते खालील प्रमाणे
            सामान्य वर्ग (जनरल), संरक्षण दलातील आजी/माजी कर्मच-यांच्या मुलांसाठी रु. 400/- अनुसूचित जाती व अनुसूचति जमाती या वर्गातील मुलांसाठी रु. 250/- राखीव जागा – अनुसूचित जाती 15% अनुसूचित जमाती 7.5% उरलेल्या जागांपैकी 67% जागा महाराष्ट्रातील मुलांसाठी 33% जागा तर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मुलांसाठी पुरुष लोकसंख्येवर आधारीत राखीव आहेत. आजी व माजी सैनिकांची मुले 25%, प्रवेश परीक्षा केंद्र-  इयता 6 वी – अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, महाड, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, इयत्ता 9 वी – फक्त सातारा अपूर्ण भरलेले अर्ज रद्द केले जातील. मुदतीनंतर ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही तसेच ऑनलाईन भरलेल्या आर्जाच्या रकमेची परतफेड होणार नाही. अधिक माहितीसाठी शाळेच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यावी किंवा शाळेच्या 02162-235860/238122 या टेलिफोन नंबरवर संपर्क साधावा.  सैनिक स्कूल सातारा हे प्रवेश परीक्षेसंदर्भात कोणत्याही मार्गदर्शन केंद्राला किंवा एजंटला प्रोत्साहन देत नाही. शाळेत प्रवेश फक्त लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे दिला जातो. धोरणात वेळोवेळी बदल झाल्यास ते बदल करण्याचे अधिकार शाळा प्रशासनास आहेत. असे प्राचार्य सैनिक स्कूल सातारा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment