Tuesday, 16 October 2018

सेवानिवृत्त विस्तार अधिका-यांची केरळ पूरग्रस्त निधीस मदत


        जळगाव, दि. 16 :- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेले आरोग्य विस्तार अधिकारी वासुदेव सुपडू राणे यांनी आपले एक दिवसाचे निवृत्ती वेतन केरळ पूरग्रस्तांसाठी  तसेच एक दिवसाचे निवृत्ती वेतन पुणे येथील पुरग्रस्तांना मदत म्हणून एकूण दोन दिवसांचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले. 15 ऑक्टोंबर 2018 रोजी मुख्यमंत्री निधीस रुपये 1400/- चा धनादेश जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे  सुपूर्द केला. इतर निवृत्ती वेतन धारकांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन  श्री. वासुदेव  राणे यांनी व्यक्त केली.
०००

No comments:

Post a Comment