Tuesday, 16 October 2018

यावल येथील आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार


        जळगाव दि. 16 -  यावल शहरात दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार येत्या शुक्रवार 19 ऑक्टोबर  ऐवजी शनिवार 20 ऑक्टोबर 2018 रोजी भरविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले आहे.
            शुक्रवार 19 ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्ती विसर्जन असल्याने शहरातून मेनरोड ते बाजार चौकापर्यंत मिरवणूक निघत असल्याने हा बदल करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
०००

No comments:

Post a Comment