जळगाव, दि.6:- यशवंतराव चव्हाण मुंबई अपंग हक्क विकास मंच, स्टार्की
फाउंडेशन अमेरीका व स्थानिक संस्थांच्या मदतीने मागील पाच वर्षापासून महाराष्ट्र
राज्याच्या विविध विभागामधील जिल्हयातील ग्रामीण भागातील विशेषशाळा मधील 0 ते 30
या वयोगटातील कर्णबधिर मुलांना अत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र बसविण्याचा मोजमाप
शिबीराचे आयोजित केल जाते. जळगाव येथे मंगळवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी
मोजमाप शिबीराचे आयोजन केले आहे. साधारणत:
एका लाभार्थ्यास दोन कानाचे दोन यंत्र व सहाय्यक साधने असे 25000/- रुपयाचे यंत्र
बसविण्यात येतात. आजपर्यंत या उपक्रमात 15000 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला
आहे. यंत्र बसविल्या नंतर त्या मुलाची भाषा, वाच विकासाचा व विविध पातळीवरील विकासाचा
आढावा देखील घेण्यात येतो.
तरी सामान्य व विशेष शाळामधील
कर्णबधिर विदयार्थ्याना या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ मिळावा या हेतुने
नोंदणीसाठी apanghakka@gmail.com लाभ या ईमेलवर
तात्काळ पाठवावे. आवश्यक कागदपत्रे – विदयार्थी आधारकार्ड / अपंग वैदयकीय दाखला/
ऑडीओग्राफ असल्यास डिजीटल श्रवणयंत्र मोजमाप शिबीराचे ठिकाण - अपंग सेवा मंडळ
मुकबधिर विदयालय, नवी पेठ नटवर टॉकीज मागे जळगाव. संपर्क क्रमांक
8805443082/9822961109
शिबीराची वेळ –
सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत सदर शिबीराचा लाभ सर्वानी घेणे बाबत जिल्हा समाज कल्याण
अधिकारी डॉ. अनिता राठोड, जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment