Friday, 26 October 2018

सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि.26 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
सोमवार  29 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी  8 वा. 15 मि.नी. महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशन  येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. सकाळी 8 वा. 30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. 30 मि.नी सामाजिक न्याय विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक. (स्थळ :- अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), सकाळी 11 वा.30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने मुक्ताईनगरकडे प्रयाण. दुपारी 12 वा 50 मि.नी संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लिमिटेड, घोडसगाव या कारखान्याच्या 5 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :-- कारखाना साईट, घोडसगाव ता. मुक्ताईनगर जि. जळगाव.)  दुपारी 3.00 वा. पर्यटन विभागामार्फत कोथळी पर्यटन क्षेत्र विकास अंतर्गत मुक्ताई मंदीर परिसरात वॉटर पार्कचे भुमिपूजन व सामाजिक सभागृहाचे लोकार्पण (स्थळ:- कोथळी, ता. मुक्ताईनगर) दुपारी  5 वा. 00 मि.नी. मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. सायं 6.30 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 11 वा. 15 मि.नी जळगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
000

No comments:

Post a Comment