Thursday, 25 October 2018

अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन भरण्याचे आवाहन


         जळगाव, दि. 25 - जिल्ह्यातील सर्व प्राचार्य/ मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की, आदिवासी विकास विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परिक्षा फी/ व्यावसायीक अभ्यासक्रमांचा निर्वाह भत्ता योजना अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नीत बॅक खात्यात थेट रक्कम जमा करणेत येत आहे.
         यासाठी शासनाकडून शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर स्कॉलरशीपच्या सर्व योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन माहिती भरावीत.  संबंधित महाविद्यालयांनी या अर्जांची ऑनलाईन पडताळणी करुन मंजुरी द्यावी.
           हे संकेतस्थळ शासनाने नव्याने विकसीत केले असून शिष्यवृत्ती अर्ज 2018-19 याच शैक्षणिक वर्षात भरणे आवश्यक आहे. यासंबंधी प्राचार्य यांनी महाविद्यालयस्तरावरुन व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी व याबाबत महाविद्यालयाच्या नोटीसबोर्डवरही सुचना लावावी. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाचे नाव किंवा अभ्यासक्रम दिसत नसल्यास त्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. संबधीत महाविद्यालयांनी आपला प्रोफाईल व फी चा तपशील ऑनलाईन अद्यावत करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, आर बी. हिवाळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment