जळगाव, दि. 23 - जिल्ह्यातील
महाराष्ट्र शासनाचे आहरण व संवितरण अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचे
निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांची कार्यशाळा शुक्रवार 26 ऑक्टोबर 2018
रोजी ठिक सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,
जळगाव येथे आयोजित आहे. अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सि. पंडित यांनी
दिली आहे.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण
अधिकारी यांची पेंशन अदालत भनिनि इ. बाबत
व निवृत्तीवेतन धारक/ कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना महाराष्ट्र राज्याचे
महालेखापाल, मुंबई श्री. अे.के बेहरा व अन्य वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार असून
त्यांच्या समस्यांचे निराकारण करणार आहेत. तरी जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी
व निवृत्तीवेतन धारक / कुटूंब निवृत्तीवेतन धारक यांनी कार्यशाळेस आर्वजुन उपस्थित
रहावे. असे आवाहन महालेखापाल, मुंबई संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य,
मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय, जळगाव यांचेद्वारे करण्यात आले आहे.
०००
No comments:
Post a Comment