जळगाव दि.6- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग, मुंबई यांनी
अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग
सुरु करणेकामी उमेदवारांची निवड करण्यासाठी राज्यस्तरावरुन दि. 5 नोव्हेंबर 2018
रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल. त्यानुसार दि. 19 नोव्हेंबर 2018 रोजी
मुख्यालयातील पोलीस परेड ग्राऊंड येथे सदर उमेदवारांची निवड करावी असे नमूद केले
आहे.
तसेच संदर्भीय पत्रात प्रशिक्षणार्थीची
शारिरिक क्षमता तपासुन निवड करण्याचे काम पोलीस अधिक्षक यांचेकडून पूर्ण केले जाईल.
तसेच आवश्यकतेनुसार पोलीस अधिक्षक संबंधित प्रशिक्षण संस्थेस खेळाचे मैदान आणि इतर
सुविधा उपलब्ध करुन देतील. तसेच शारिरिक क्षमता प्रशिक्षणांसाठी मार्गदर्शन आणि
मदत करतील असे नमुद केले आहे.
तरी
सदर प्रशिक्षणार्थ्यांची निवड करणेकामी आवश्यक असणारे सर्व साहित्य व कर्मचारी
वर्ग आपण आपले स्तरावरुन उपलब्ध करुन दयावे, असे जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment