जळगाव, दि. 1 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे -
मंगळवार, दि. 2 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत पाळधी, ता.
धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
दुपारी 1.00 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. जळगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7.00 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं
7.30 वा. पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. रात्री 10.30 वा. जळगाव रेल्वे
स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11.15 वा. अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment