जळगाव, दि. 7 :- राज्याचे
महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढील प्रमाणे.
सोमवार दि. 8 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी
8.13 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह,
जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून
शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता आगमन व
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या
महत्वाच्या प्रकल्प, योजनांचा आढावा बैठक व कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक व
महानगरपालिका आढावा बैठक तसेच विविध कार्यक्रमांना उपस्थिती. (स्थळ :- नियोजन भवन,
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सायं सोईनुसार मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत
विमानाने मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment