जळगाव, दि. 19 :- जिल्हा समादेशक
होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव यांच्या अखत्यारीतील जळगाव, चोपडा, वरणगाव,
भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, सावदा, मुक्ताईनगर, भडगाव, अमळनेर, धरणगाव, फैजपुर,
रावेर, एरंडोल, पारोळा व जामनेर या पथकातील पुरुष व महिला होमगार्ड अनुशेष भरुन
काढण्याच्या दृष्टीने नविन होमगार्ड सदस्य नोंदणीकरीता 23 ऑक्टोबरला सकाळी 7 ते 10 या
वेळेत पोलीस मुख्यालयातील स्केटींग ग्राऊंडवर चिमुकले राम मंदिर शेजारी
महात्मा गांधी उद्यान समोर जळगाव येथे नोंदणी प्रक्रीयेसाठी प्रवेश देण्यात येईल.
तरी वरील तालुक्यातील गावातील स्थानिक नगरपालीका / पथक कार्यालय हद्दीतील ईच्छुक
उमेदवारांनी आपल्या स्वखर्चाने व स्वत:च्या वैयक्तीक जबाबदारीवर नमुद तारखेस व
वेळेत विहीत ठिकाणी हजर रहावे.
नोंदणीसाठी
सोबत आवश्यक ते सर्व फॉर्म व शैक्षणीक कागदपत्रे
रेशनकार्ड, मतदानकार्ड, आधारकार्ड यांच्या सत्यप्रती व मुळ
प्रतीसह दोन पासपोर्ट फोटोग्राफसह वरील वेळेत नमुद ठिकाणी उपस्थित रहावे.
नोंदणीबाबत माहिती व फॉर्म www.jalgaon.nic.in व www.jalgaonpolice.gov.in वर उपलब्ध करण्यात आलेली
आहे. उशिरा आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. याची सर्व संबधीतांनी
कृपया नोंद घ्यावी.
नविन होमगार्ड सदस्य
नोंदणी करीता आवश्यक अटी व पात्रता खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
शैक्षणिक
पात्रता – कमीत कमी इ. 10 वी पास असणे आवश्यक, वयाची अट – 20 वर्षे पुर्ण ते 50
वर्षे वयाचे आत, शारिरिक पात्रता – उंची पुरुष उमेदवारांसाठी -162 सेंटीमीटर कमीत
कमी, उंची महिला उमेदवारांसाठी -150 सेंटीमीटर कमीत कमी , छाती पुरुष उमेदवारासाठी
– न फुगवीता 76 सेंटीमीटर व फुगवुन 81 सेंटीमीटर, यापुर्वी होमगार्ड संघटनेत
असलेले परंतु अकार्यक्षक, गैरशिस्त, अफरातफर न्यायालयीन प्रकरणी दोषी असलेले/
ठरलेले या कारणास्तव होमगार्ड संघटनेतुन कमी केलेले उमेदवार नोंदणीसाठी अपात्र
असतील, नवीन होमगार्डस सदस्य नोंदणी निवड पुर्णपणे गुणवत्तेवर (मेरीट) आधारीत
असुन, उमेदवाराने कोणाचेही शिफारसपत्र किंवा दबाव आणल्यास त्यास अपात्र घोषीत
करण्यात येईल. उमेदवारास विहीत केलेल्या वेळेत धावणे व गोळा फेक शारिरिक चाचणी
द्यावी लागेल, निवड होवुन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असेल तर त्यांना
कार्यालयाचे / मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र,
वैद्यकीय अधिका-यांचे शारिरीक दृष्टया सक्षम असल्याचे प्रमाणपत्र तसेच माजी सैनिक
/ एन.सी.सी.चे बी/ सी प्रमाणपत्र धारक व इतर अन्य तपशिलाचे पृष्ठयर्थ सर्व संबंधीत
प्रमाणपत्रे सादर करणे बंधन कारक राहील. नोंदणीच्या वेळी उमेदरवारास कोणतीही
अपघाती घटना घडल्यास त्यांची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील, शारिरिक
विकलांगता असलेले उमेदवार नोंदणीसाठी अपात्र राहतील, नगरपालीका / पथक/ उपपथकांचे
हद्दील वास्तव्य करणारे उमेदवार सदर संबधीत पथकातील नेांदणीसाठी पात्र राहतील.
सदरील नविन होमगार्ड सदस्य
नांदणी कार्यक्रम रद्द करणे / पुढे ढकलण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड तथा
अप्पर पोलीस अधिक्षक यांना राहील. असे होमगार्ड नोदणी निवड समिती अध्यक्ष तथा
जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक जळगाव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे. ०००
No comments:
Post a Comment