जळगाव, दि. 4- सर्व संबंधित वजने मापे उत्पादक / दुरुस्तक / विक्रेते
यांचे सन 2019 या सालाकरीता नुतनीकरणाची प्रक्रीया सुरु झालेली आहे. त्या
अनुषंगाने वैधमापन शास्त्र यंत्रणेतील वजने मापे परवानाधारक यांनी त्यांचे परवाने
सन 2019 करीत Online सादर करणे बंधनकारक केले आहे.
त्याबाबत वैधमापन शास्त्र
यंत्रणेने स्वतंत्र portal विकसित केले असून यापुढे सर्व परवानाधारक यांनी
त्यांचे उत्पादक/ दुरुस्तक/विक्री परवाने हे
http://www.vaidhmapan.maharashtra.gov.in
:443/Homepage/idex.htr या संकेत
स्थळावरुन नुतनिकरण करण्याचा अर्ज व त्या बाबतची आवश्यक ती कागदपत्रे संकेतस्थळावर
दिनांक 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत अपलोड करावी. या बाबत काही अडचणी येत असल्यास
कार्यालयास दुरध्वनी क्रमांक -0257-241149 व भ्रमणध्वनी क्रमांक 9423927404 येथे
संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक नियंत्रक, श्री. रा.भ.बांगर, वैधमापन शास्त्र,
जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment