Wednesday, 17 October 2018

रावण दहण कार्यक्रमासाठी आज शहरातील वाहतुक मार्गात बदल

        जळगाव, दि. 17 –रावण दहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन 18 ऑक्टोबर रोजी मेहरुण तलाव, शिरसोली रोड येथे होत आहे. जळगाव शहरातील नागरीक मोठया प्रमाणात रावण दहण  कार्यक्रमात  सहभागी होतात.  मोठया प्रमाणावर होणारी गर्दी नियमन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव शहरातील पुढील वाहतुक मार्गात  बदल करण्यात येत आहे.
                दि. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यत मोहाडी रोड वाय पाँईट पासून ते ग्राफीक्स हॉटेल जवळ शिरसोली रोडवरील ग्राफीक्स हॉटेल हाजी मलंग बाबा दर्गा पर्यतचा मार्ग सर्व वाहनांना बंद करण्यात आले आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेली आहे. नागरीक बंद करण्यात आलेल्या मार्गा ऐवजी मोहाडी वाय पाँईट पासून ते महाबळ चौकाकडे या पर्यायी रस्त्याचा वापर करु शकतात. असे पोलीस अधिक्षक श्री. दत्ता शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविलेले आहे.
०००

No comments:

Post a Comment