जळगाव दि. 16 – केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई
वडिल व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम -2007 पारीत केला
असून सदरचा अधिनियम शासनाने दिनांक 1
मार्च 2009 पासून लागू केला आहे. केंद्र शासनाचे अधिनियमांचे अनुषंगाने राज्य
शासनाने 23 जून, 2010 अन्वये नियम 2010 पारीत केलेले आहेत. तसेच राज्य शासनाने सन
2013 मध्ये राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केलेले आहे.
दरवर्षी दिनांक 1 ऑक्टोबर हा जागतिक
ज्येष्ठ नागरीक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन ज्येष्ठ
नागरिकांच्या संदर्भातील कायदे, शासनाच्या विविध योजना यांची माहिती या माध्यमातून
सर्वसामान्य जनतेपर्यत सुलभरित्या पोहचविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन भवन
हॉल जळगाव येथे 19 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.
असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
०००
No comments:
Post a Comment