जळगाव, दि. 15 - जिल्हा
दक्षता व नियंत्रण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोरराजे
निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न
झाली यावेळी बैठकीत अनुसूचीत जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली
नोंदविलेल्या गुन्हांचा तपास कार्याचा आढावा घेण्यात येवून कार्यवाही करणे बाबत
संबधीत अधिका-यांना सूचना देण्यात आल्या.
या
बैठकीत जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके,
समाज कल्याण अधिकारी श्री. योगश पाटील जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती अनिता राठोड
,पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक (नाहसं) व्ही.के. बोदडे
आदि उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment