Wednesday, 31 October 2018

राष्ट्रीय एकता दौड मध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांच्या समवेत धावले अवघे जळगावकर


        



         जळगाव, दि. 31 :- सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आली. यानिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते.  या दौडला पोलीस मुख्यालय येथे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.
            या एकता दौडमध्ये राज्याचे जलसंपदा व वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांच्यासह अवघे जळगावकर धावले. यावेळी आमदार सुरेश भोळे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, चाळीसगाव येथील अपर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उप अधिक्षक सचिन सांगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांचेसह या रॅलीत विद्यार्थी, तरुण- तरुणी, नागरिक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या दौडची सुरुवात पोलिस मुख्यालय येथून झाली. ही दौड आकाशवाणी चौक - काव्यरत्नावली चौक- डी मार्ट चौक -  ईच्छादेवी चौक- पांडे डेअरी  चौक- सुभाष चौक - रथ चौक - भिलपूरा चौक - घानेकर चौक, नेहरु चौक मार्गे  पोलिस मुख्यालयात  या रॅलीचा समारोप करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
            सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती अर्थात राष्ट्रीय एकता दिवस व दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस पाळण्यात आला. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसिलदार मंदार कुलकणी, नायब तहसीलदार पंकज लोखंडे आदिंसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment