जळगाव दि.10- ज्या माजी
सैनिकांनी 1962 (भारत – चीन), 1965 (भारत – पाक) व 1971 (भारत – पाक) या
युध्दांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. अशा माजी सैनिक व त्यांचे विधवा किंवा
त्यांचे 25 वर्षाखालील अवलंबित यांना सैन्यसेवेचे पेन्शन किंवा शासनाकडून कुठलाही
लाभ मिळत नसल्यास व जे माजी सैनिकाच्या व्याख्येत येतात अशा माजी सैनिक / विधवा पत्नी/
अवलंबित यांनी त्यांचे डिस्चार्ज पुस्तक व जिल्हा सैनिक कार्यालयाकडून मिळालेले ओळखपत्र
घेऊन त्यांनी कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment