Tuesday, 9 October 2018

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन


        जळगाव, दि. 9 -  शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागातंर्गत मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना सुरु असुन उच्च शिक्षण घेणा-या अल्पसंख्यांक                (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, सिख, पारसी, जैन, ज्यू) समाजातील विद्यार्थ्यानी या योजनेचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा. असे आवाहन मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी  केले आहे.
अल्पसंख्यांक गरीब गरजु विद्यार्थ्यांसाठी (राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा 5 लाखापर्यत ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार व शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार रुपये आहे) व        (मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा 2.5 लाखापर्यंत ज्यांचे उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रुपये आहे) यासाठी व्याजदर फक्त 3% दराने शैक्षणिक कर्ज योजना सुरु असुन त्याची ऑनलाईन फार्म भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर, 2018 पर्यत आहे. व ऑफलाईन फार्म जिल्हा कार्यालयात जमा करण्याची मुदत 15 डिसेंबर, 2018 आहे. सदरचा ऑनलाईन फार्म  https://malms.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जावुन भरावा. फार्म सबमिट झालेवर त्याची प्रिंट काढुन सदर फार्मवर फोटो व त्यावर सह्या करुन दोन प्रती पुठयाच्या फाईल्स मध्ये सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, आकाशवाणी चौक, ग्राहक मंचाच्या मागे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इमारत जळगाव-425001 या पत्त्यावर फाईल जमा करावी. अधिक माहितीसाठी मो. 7588007560 वर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  
०००

No comments:

Post a Comment