जळगाव,
दि. 3- महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास विभागामार्फत सन 2015-16, 2016-17, आणि
2017-18 या वर्षासाठी महिला व बालकल्याण
क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या समाज सेविका व स्वयंसेवी संस्थांना पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार आहेत. जळगाव जिल्हयातील महिला व
बालकल्याण क्षेत्रात कमीत कमी 5 वर्ष उत्कृष्ट कार्य असणा-या स्वंयसेवी संस्थांना
विभाग स्तरीय पुरस्कार देण्यासाठी योग्य
महिलांचे व संस्थाचे प्रस्ताव मागविणेत
येत आहे. तरी पात्र महिला व स्वंयसेवी संस्थांनी विहीत नमुन्यात आवश्यक
त्या कागदपत्रांसह त्वरीत प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, दुसरा मजला,
प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगाव दुरध्वनी क्र. 0257-2228828 येथे दिनांक 15 ऑक्टोंबर 2018 पर्यंत सादर करावेत.
अधिक माहिती व विहित नमुना अर्जाकरीता कर्यालयास संपर्क साधावा असे आवाहन, करण्यात येत
आहे. असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
०००
No comments:
Post a Comment