Wednesday, 10 October 2018

कुक्कुट पालक व्यवसायिकांनी १७ ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करावी


        जळगाव दि.10:-  महाराष्ट्र राज्य कुक्कुट विकास आणि प्रतिबंधक कायदा 2018 या अंतर्गत कुक्कुट प्रक्षेत्राशी सबंधित असलेल्या सर्व  कुक्कुट पालक व्यवसायिकांवर उत्तम प्रकारची अंडी व मांस पोहचविण्याची जबाबदारी आहे. तसेच माणसाच्या आरोग्यावर व पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही  याबाबत दक्षता घेण्यात  घ्यावी. सर्व कुक्कुट पालक व्यवसायिकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, जळगाव या कार्यालयात नोंदणी  अर्ज कार्यालयीन वेळेत मिळतील, सकाळी 11 ते 2 वाजेपर्यत 17 ऑक्टोबर 2018 पर्यत नोंदणी करणे बंधनकारक आहे. याची सर्व कुक्कुट पालक व्यवसायिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment