Friday, 26 October 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा


जळगाव, दि.26 :- राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
गुरुवार दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता दोंडाईचा येथील निवासस्थान जि. धुळे येथून शासकीय/खाजगी वाहनाने घोडसगाव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगावकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता संत मुक्ताई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रिज लि. कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती तसेच इतर पर्यटन विषयक कामांचा शुभारंभ (स्थळ :- संत मुक्ताई शुगर ॲड अलाईड इंडस्ट्रिज लि. कारखाना साईड घोडसगाव ता. मुक्ताईनगर), सोईनुसार शासकीय/खाजगी वाहनाने भुसावळ जि.जळगावकडे प्रयाण. सायं. 6.55 भुसावळ रेल्वे स्थानक, जि.जळगाव येथे आगमन व अमृतसर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण. अथवा रात्री 9.10 वा. हावडा मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण.
000000

No comments:

Post a Comment