जळगाव, दि. 15 - दर महिन्याच्या तिसऱ्या
सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज निवासी उपजिल्हाधिकारी श्री.राहल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात
पार पडला.
या लोकशाही दिनात गृह शाखा पोलिस अधीक्षक
कार्यालय, जळगाव या कार्यालया संबंधित एक अर्ज, निवासी जिल्हाधिकारी / संरक्षण
अधिकारी पाचोरा जि. जळगाव या कार्याल्याच्या
संबधित एक अर्ज, विभागीय अधिकारी M.I.D.C
धुळे यांच्याकडील एक अर्ज असे एकूण तीन तक्रार अर्ज प्राप्त झाले
आहे.
यावेळी महिला वरीष्ठ पोलिस अधिकारी, मुख्य
कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे प्रतिनिधी,
सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी व संरक्षण अधिकारी
हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षांनी महिला लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व
निकाली अर्जांचा आढावा घेऊन तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सुचना
दिल्यात. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment