जळगाव दि. 1 :- आयटी क्षेत्र असो की, खेळाचे क्षेत्र असो सर्व क्षेत्रात भारतीय युवक
पुढे आहेत. कारण त्या विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचे काम जिल्हा परिषदेचे
शिक्षक करतात, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम
मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
गंधे सभागृहात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक
शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण पालकमंत्री
महोदयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई
पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, शिक्षक
मतदार संघाचे आमदार किशोर दराडे, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपटतात्या
भोळे, समाज कल्याण समितीचे सभापती प्रभाकर सोनवणे, बांधकाम व महिला व बालकल्याण
सभापती रजनीताई चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव दिवेकर
व इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुढे
म्हणाले की, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहू नये यासाठी मुलांना इंग्रजीचे ज्ञान अवश्य द्यावे, परंतु
त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकावे. आता जिल्हा परिषदेच्या शाळाही डिजीटल होत
आहेत. गावातील लोकांनी ही माझी शाळा आहे असे समजून लोकसहभागातून शाळेची दुरुस्ती
केल्यास गावातील काही लोक पुढाकार घेवून देणगी देण्यास स्वत:हून पुढे येतील असेही
त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत भिला पाटील, जि. प. शिक्षक, शिरुळ, ता.
अमळनेर, संजय रतन पाटील, उपशिक्षक, जि. प. शाळा, जुवार्डी, ता. भडगाव, श्रीकृष्ण
प्रल्हाद पाटील, उपशिक्षक, जि. प. शाळा, कन्हाळे बु. खु. ता. भुसावळ, सुनिल
बाबुराव माळी, जि. प. शाळा जामठी, ता. बोदवड, मच्छिंद्र रमेश कोळी, उपशिक्षक,
शिवाजी आदर्श केंद्र शाळा, ता. चोपडा, शालीग्राम शिवाजी निकम, उपशिक्षक, जि. प.
शाळा माळशेवगे, ता. चाळीसगाव, प्रमोद सुकदेव पाटील, पदवीधर शिक्षक, जि. प. शाळा,
निंभोरे, ता. धरणगाव, श्रीमती अलका आनंद पाटील, उपशिक्षीका, जि. प. शाळा, कढोली,
ता. एरंडोल, गणेश मोहन बागुल, उपशिक्षक, मोहाडी, ता. जळगाव, प्रविण रामा कुऱ्हाडे,
पदविधर शिक्षक, जि. प. शाळा लहासन, जामनेर, दिपक भिवसन पाटील, उपशिक्षक, जि. प.
शाळा दिवगाव, ता. पारोळा, राजेंद्र बबन राठोड, पदवीधर शिक्षक, वडगावकडे, ता.
पाचोरा, भिमराव शालीग्राम पवार, उपशिक्षक, जि. प. शाळा मुक्ताईनगर, प्रमोद दत्तु
पाटील, उपशिक्षक, जि. प. शाळा जुनोने, ता. रावेर, श्रीमती सीमा ज्ञानदेव जावडे,
उपशिक्षीका, जि. प. प्राथमिक कन्या शाळा, पाडळसे, ता. यावल या शिक्षकांना
मंत्रीमहोदयांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. जिल्हास्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार श्रीमती
खुदेजा बी. शेख युसुफ ग्रेडेड, मुख्याध्यापिका, जि. प. उर्दू केंद्र शाळा बाईज नं.
1, नशिराबाद यांना देण्यात आला. तर राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले सायबु मयलू
तडवी, जि. प. शाळा, रावेर, मनतंराव साळुंखे, डॉ. ईश्वर शेकनाथ पाटील, राणी
लक्ष्मीबाई ज्युनियर कॉलेज, पारोळा या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना यावेळी शाल,
श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रुपये दोन हजार रोख स्वरुपात
देण्यात आले.
या
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक, त्यांचे कुटूंबिय, नातेवाईक तसेच जिल्हा
परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment