Wednesday, 31 January 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 31 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा गुरुवार व शुक्रवार दि. 1 व 2 फेबुवारी,2018  रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 1 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेआठ वाजता बोरगाव ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. बोरगाव ता. धरणगाव येथे एम. एस. ई. बी. सबस्टेशन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी साडे नउ ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी  10 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी . सांय 7 वा. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. 
०००

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा



      जळगाव, दि. 31 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे गुरुवार दि. 1 फेब्रुवारी, 2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
       गुरुवार दि. 1 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी 6 वा. 45 मि. नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगाकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर जि. जळगाव येथे आगमन, रात्री मुक्काम जामनेर, जि. जळगाव.
०००

विणकरांनी हातमाग कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन



            जळगाव, दि. 31 - केंद्र शासनाचे हातमाग (उत्पादनार्थ वस्तूंचे आरक्षीत) अधिसूची अन्वये 11 वाण हातमागावर उत्पादन करण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. या वाणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाणाचे उत्पादन हातमागा व्यतिरीक्त इतर कोणत्याही मागावर अथवा तत्सम मागावर घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशी माहिती प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
            हातमाग उद्योगाचे संरक्षण व विकासाकरीता कायदा असून राजपत्रात निर्धारीत केलेले वाण साडी, धोतर, टॉवेल/गमछा/अंगवस्त्रम, लुंगी, बेडशीट/बेडकव्हर/खेस, पलंगपोश, फर्निशिंग (ज्यात टेपस्ट्री, अप्लोस्ट्री अंतर्भुत आहेत), दरी/सतरंजी, ड्रेस मटेरीयल, कंबल, शाल/मफलर/पंखी, लोकरी कापड, चादर/मेखला किंवा फानिक हे 11 वाण हातमागावर उत्पादन करणेसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत.
            उत्पादकांना आवाहन करण्यात येते की, नमूद वाणाचे उत्पादन हातमागा व्यतिरीक्त इतर कोणत्याही मागावर अथवा तत्सम मागावर घेणे हा कायदयाने गुन्हा आहे. या 11 वाणापैकी कोणत्याही वाणाचे उत्पादन हातमागा व्यतीरिक्त यंत्रमागावर अथवा तत्सम मागावर जर कोणी घेत असल्याचे निर्दशनास आल्यास प्रादेशिक कार्यालय, हातमाग विकास आयुक्त, एन्फोर्समेंट विंग, गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळ कॅम्पस, जुना वडज, आश्रम रोड, अहमदाबाद - 380 013, टेलीफॅक्स- (079) 27553004 आणि 27557081, ईमेल- Email-rodchewadi@gmail.com तसेच प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, 7 वा माळा, चरई, टेलिफोन एक्स्चेज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, चरई, ठाणे (पश्चिम)- 400 601, ईमेल- rddtextiles3mumbai@rediffmail.com दूरध्वनी क्रमांक - (022) 25405363 वर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक, मुंबई यांनी केले आहे.
००० 

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आर्थिक सहाय्य मिळणेसाठी 7 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत



        जळगाव, दि. 31 - अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षण अथवा इतर बाबींसाठी आर्थिक सहाय मिळावे. याकरीता विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांसह जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हळुंगे-बालेवाडी, पुणे यांचेकडे 7 फेब्रुवारी, 2018 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
        राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत. यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडुंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख याबाबी विचारात घेवून क्रीडा धोरण-2012 तयार करण्यात आले  आहे. या अतंर्गत महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणेचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी  होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन इ. देश, विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात व खरेदी करणे, गणवेश इत्यादीसाठी खेळाडूंना अर्थसहाय्य देण्यात येते.
            या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्यु. विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/ जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप या स्पर्धांना अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे.
            ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या खेळ/क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. तेच खेळ/ क्रीडा प्रकार नमुद इतर स्पर्धामध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय असणार आहे. मात्र कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद या शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे.
         या योजनेच्या अधिक माहितीकरिता जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथील कार्यालयाशी ( दुरध्वनी क्रमांक - 020-27390371, विस्तारीत क्र 214) वर संपर्क करावा. असे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्यांनी आयकर सुट मिळणेबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन



        जळगाव, दि. 31 - जिल्ह्यातील कोषागारांतर्गत निवृत्तीवेतन घेणा-या आयकर पात्र सेवानिवृत्ती, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी आयकर सुट मिळणेसाठी केलेल्या बचतीचे सर्व कागदपत्रे 15 फेब्रुवारी, 2018 पावेतो कोषागार कार्यालयात जमा करावीत. असे आवाहन श्री. प्र.सि.पंडीत जिल्हा कोषागार अधिकारी जळगाव यांनी केले आहे.
            जेणेकरुन जिल्ह्यातील निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना लागू असलेला आयकर कपात करणे किंवा बचत केलेल्या रमक्कमेतून आयकर सुट देणेबाबतची कार्यवाही कोषागारास माहे फेब्रुवारी-2018 देय मार्च 2018 च्या निवृत्ती, कुटूंबनिवृत्ती वेतनातुन करणे सुलभ होईल. असेही कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
०००