Tuesday, 16 January 2018

जळगाव डाक विभागातील डाक सेवा 20 व 22 जानेवारी रोजी बंद राहणार



जिमाका-जळगाव. दि.१६:- जळगाव डाक विभागातील सर्व डाक कार्यालये सी. एस. आय प्रणालीमध्ये बदलत आहेत. त्यामुळे शनिवार २० जानेवारी व सोमवार २२ जानेवारी, २०१८ या दोन दिवशी सी.एस.आय प्रणालीची तांत्रिक कामे सुरु राहणार आहे. यास्तव जळगाव डाक विभागाच्या सर्व प्रकारच्या सेवा २० व २२ जानेवारी रोजी बंद राहणार आहेत.
या कालावधीत कोणत्याही प्रकारचे कामकाज होणार नसल्याने नागरिकांनी या दोन दिवशी कोणत्याही प्रकारचे कामकाजकरिता पोस्ट कार्यालयात येऊ नये. असे आवाहन अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.  
०००००

No comments:

Post a Comment