जळगाव, दि. 24 - जवाहर नवोदय विद्यालय, साकेगांव, ता. भुसावळ येथे प्रवेश
मिळण्यासाठी शनिवार 10 फेब्रुवारी, 2018 रोजी होणारी सन 2018 ची प्रवेश परीक्षा काही
तांत्रिक अडचणीमुळे स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती जवाहन नवोदय विद्यालयाचे
प्राचार्य वै. नारायणा राव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे परिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचे नवोदय विद्यालय
समिती, मुख्यालय नोयडा यांनी प्राचार्यांना कळविले असून प्रवेश परिक्षेची पुढील
तारीख लवकरात लवकर कळविण्यात येणार आहे. याबाबतची नोंद सर्व विद्यार्थी, पालक,
शिक्षक यांनी घ्यावी. असेही प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
No comments:
Post a Comment