Monday, 1 January 2018

जिल्हा एड्स नियंत्रण समितीची बैठक संपन्न



            जिमाका-जळगाव, दि. 1 :- जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष  गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, शहरी क्षयरोग अधिकारी डॉ. राम रावलाणी, एआरटी सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलीमा चौरे, महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, एड्स विभागाचे गिरीश गडे, मोझीम खान,  डॉ. प्रशांत जयाभाई, डॉ. निलेश पाटील, एचआयव्ही विभागात काम करणारे अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.
यावेळी एड्स नियंत्रण विभागाकरीता नवीन संगणक, एआरटी केंद्रातील दुरुस्ती यासाठी स्थानिक आमदार निधीतून करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. नियोजन समितीच्या निधीतून शीतकपाट देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, एच.आय.व्ही., राष्ट्रीय आरोग्य अभियान निधीतून एड्स व सर्वोपचार एआरटी औषधोपचार विषयीची माहिती तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील दर्शनीय भिंतीवर रंगविण्यात यावी  अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
            या बैठकीत जिल्ह्यातील आयसीटीसी केंद्रामध्ये सर्वसामान्य व गरोदर मातांच्या तसेच इतर घटकांतील एचआयव्हीचा प्रादुर्भाव व तपासण्या, क्षयरोग व एआरटी केंद्रामध्ये औषधोपचाराच्या कामाचा अहवाल, एचआयव्ही संसर्गिंत बालक व रुग्णांचे जीवनमान उंचावण्याकरिता त्यांना पोषक आहार व शासनाच्या आर्थिक लाभांच्या योजना, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील कामगारांकरिता एचआयव्ही समुपदेशन व तपासणीची सुविधा, एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या सर्व लोकांना औषधोपचार मोफत देणे आदि विषयांवर चर्चा झाली.
            या बैठकीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी जिल्हा एड्स नियंत्रण समितीच्या कामकाजाची मुद्देसुद माहिती सादर केली.
000

No comments:

Post a Comment