Friday, 19 January 2018

केंद्र पुरस्कृत अपघात गटविमा योजनेतंर्गत राज्यातील नोंदणीकृत मच्छिमारांची माहिती 31 जानेवारीरपूर्वी सादर करावी



          जिमाका-जळगाव, दि. 19:- मच्छिमार सहकारी संस्थामधील नोंदणीकृत सभासदांना, अपघात गटविमा योजनेअंतर्गत मच्छिमारांना विमा संरक्षण व नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यांच्या वारसांना विमा रक्कम देण्याकरिता फिशकोपफेड, नवी दिल्ली यांनी माहिती मागितलेली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नोंदणीकृत मच्छिमार संस्थांनी  त्यांची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), मंडोरे बिल्डींग, डॉ. आंबेडकर मार्केट जवळ, जळगाव या कायालयात 31 जानेवारी, 2018 पर्यंत स्वहस्ते सादर करावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), जळगाव यांनी केले आहे.
            नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्थेमधील मच्छिमार सभासदांचे नाव व पत्ता, आधारकार्ड नंबर, जन्म दिनांक, बॅंकेचे खाते नंबर, आयएफएससी कोड नंबर, बॅकेचे नाव  व पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, वारसाचे नाव व स्त्री, पुरुष असल्याबाबतची माहिती इंग्रजी / मराठी प्रपत्रात भरुन पाठवावी.  माहिती सादर न केल्यास शासनाच्या योजनांचा लाभ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मिळू नाही. असेही  सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment