Wednesday, 24 January 2018

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



       जळगाव, दि. 24 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर  हे शनिवार दि. 27 जानेवारी, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            शनिवार, दि. 27 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 7 वा. 30 मि. नी. भक्ती निवास, जालना येथून बोदवड, जि. जळगावकडे प्रयाण. (मार्ग-जालना-भोकरदन-अजिंठा-सिल्लोड-पहूर-जामनेर-बोदवड) सकाळी 11 वा. बोदवड येथे आगमन व 51 गावे पाणी पुरवठा योजनेच्या भुमिपुजन समारंभास उपस्थिती ता.बोदवड व मुक्ताईनगर. (स्थळ :- बोदवड) दुपारी 1 वा. बोदवड येथून तळवेल, ता. भुसावळकडे प्रयाण. दुपारी 2 वा. तळवेल, ता. भुसावळ येथे आगमन व 31 गावे पाणी पुरवठा योजनेच्या भुमिपूजन समारंभास उपस्थिती. (स्थळ :- तळवेल, ता. भुसावळ), दुपारी 2 वा. 30 ते 3 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 3 वा. तळवेल येथून खडका, ता. भुसावळकडे प्रयाण. दुपारी 3 वा. 30 मि.नी. खडका, ता. भुसावळ येथे आगमन व खडका पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. (स्थळ :- खडका, ता भुसावळ), सायं 5 वा. 30 मि.नी. खडका ता. भुसावळ येथून जालनाकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment