Wednesday, 31 January 2018

विणकरांनी हातमाग कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन



            जळगाव, दि. 31 - केंद्र शासनाचे हातमाग (उत्पादनार्थ वस्तूंचे आरक्षीत) अधिसूची अन्वये 11 वाण हातमागावर उत्पादन करण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. या वाणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाणाचे उत्पादन हातमागा व्यतिरीक्त इतर कोणत्याही मागावर अथवा तत्सम मागावर घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशी माहिती प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
            हातमाग उद्योगाचे संरक्षण व विकासाकरीता कायदा असून राजपत्रात निर्धारीत केलेले वाण साडी, धोतर, टॉवेल/गमछा/अंगवस्त्रम, लुंगी, बेडशीट/बेडकव्हर/खेस, पलंगपोश, फर्निशिंग (ज्यात टेपस्ट्री, अप्लोस्ट्री अंतर्भुत आहेत), दरी/सतरंजी, ड्रेस मटेरीयल, कंबल, शाल/मफलर/पंखी, लोकरी कापड, चादर/मेखला किंवा फानिक हे 11 वाण हातमागावर उत्पादन करणेसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत.
            उत्पादकांना आवाहन करण्यात येते की, नमूद वाणाचे उत्पादन हातमागा व्यतिरीक्त इतर कोणत्याही मागावर अथवा तत्सम मागावर घेणे हा कायदयाने गुन्हा आहे. या 11 वाणापैकी कोणत्याही वाणाचे उत्पादन हातमागा व्यतीरिक्त यंत्रमागावर अथवा तत्सम मागावर जर कोणी घेत असल्याचे निर्दशनास आल्यास प्रादेशिक कार्यालय, हातमाग विकास आयुक्त, एन्फोर्समेंट विंग, गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळ कॅम्पस, जुना वडज, आश्रम रोड, अहमदाबाद - 380 013, टेलीफॅक्स- (079) 27553004 आणि 27557081, ईमेल- Email-rodchewadi@gmail.com तसेच प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, 7 वा माळा, चरई, टेलिफोन एक्स्चेज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, चरई, ठाणे (पश्चिम)- 400 601, ईमेल- rddtextiles3mumbai@rediffmail.com दूरध्वनी क्रमांक - (022) 25405363 वर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक, मुंबई यांनी केले आहे.
००० 

No comments:

Post a Comment