Tuesday, 16 January 2018

अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारीचे धान्य उपलब्ध



        जिमाका-जळगाव. दि. १६:- जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेच्या एक लाख ३७ हजार ५४४ कार्डधारक लाभार्थ्यांसाठी गहू आणि ज्वारी या धान्याचा फेब्रुवारी २०१८ साठी असलेला साठा उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत गहू २१ हजार २४५ क्विंटल, ज्वारी  ३ हजार ५१० क्विंटल, व मका १ हजार ३७५ क्विंटल व तांदूळ २२ हजार १० क्विंटल याप्रमाणे तर प्राधान्य कुटूंब योजनेतील बावीस लाख ६३ हजार ५५ कार्डधारक लाभार्थ्यांसाठी गहू ४५ हजार २६० क्विंटल, मका २२ हजार ६३० क्विंटल व तांदूळ ४५ हजार २६० क्विंटल याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यासाठी साठा उपलब्ध आहे. 
            गहू दोन रुपये प्रति किलो, ज्वारी व मका एक रुपया प्रति किलो आणि तांदूळ तीन रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत. पात्र लाभार्थी कार्डधारकांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन जावे. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment