जिमाका-जळगाव, दि. 1 :- जिल्हा दक्षता
समितीची बैठक आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
यावेळी
जिल्हास्तरीय दक्षता समितीचे सदस्य सचिव तथा प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी अभिजीत
भांडे पाटील, अशासकीय सदस्य जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उत्तम सपकाळे,
आत्माराम कोळी, सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, श्रीमती मीनाताई
तडवी, श्रीमती अर्चना विशाल पाटील आदी उपस्थित होते.
या बैठकीत लाभार्थ्यांचे शिल्लक धान्य
त्याच महिन्यात द्यावे, स्वस्त धान्य दुकानदारांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे,
जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांकासह यादी स्वस्त
धान्य दुकानाच्या बाहेर ग्राहकांना दिसेल अशी लावावी. दुकानांची तपासणी करतांना
समितीच्या सदस्यांसोबत गावाच्या पोलीस पाटील यांनी जावे, ग्रामपंचायतीच्या
जन्म-मृत्यू च्या नोंदीनुसार गावातील मयत झालेल्या व्यक्तींची नावे
लाभार्थ्यांच्या यादीतून कमी करावे, मयत व्यक्तींच्या नावे धान्य घेणाऱ्यास दोषी
समजावे. शिधापत्रीका नसलेल्या गरजू माणसाला लाभ मिळण्यासाठी समितीच्या सदस्यांनी
कार्य करावे. पॉस मशिनसाठी शासनाकडून सीमकार्ड येईपर्यंत स्वस्त धान्य
दुकानदारांनी स्वत:चे कार्ड वापरावे, मशिनसाठी कागद रोलचा योग्य प्रमाणात पुरवठा
करावा. आधारकार्डसंदर्भातील डाटाएन्ट्री झाली नसलेल्या लाभार्थ्यांना मॅन्यूअल
पध्दतीने धान्य द्यावे. अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी
दिल्या.
000
No comments:
Post a Comment