जिमाका-जळगाव,
दि. 5:- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे मंगळवार 9 जानेवारी
2018 रोजी सकाळी दहा वाजता ॲप्रेटीशीप भरती मेळावा आयोजीत केला आहे. आयटीआय
उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा फायदा
घ्यावा. असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक
सुचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
या
भरती मेळाव्यासाठी व्हिडीओकॉन धुत ट्रॉन्समिशन, बडवे इंजिनिअरींग, औरंगाबाद व
सुप्रीम इंडस्ट्रीज, फाउंडेशन ब्रेक्स, जैन इरिगेशन, जळगाव येथील आस्थापनांचे
प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भरती मेळावा मेस हॉल, आयटीआय, जळगाव येथे होणार आहे.
०००००
No comments:
Post a Comment