जळगाव, दि.31 - आदिवासी विकास विभागामार्फत सन 2018-19 या शैक्षणिक
वर्षात इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या आदिवासी
विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्याची योजना राबविण्यात येत
आहे. यासाठी परीपूर्ण भरलेला अर्ज 10 मार्च, 2018 पूर्वी प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल जि. जळगाव यांचेकडे सादर करावा. असे आवाहन
श्री. आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.
या
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा. अनुसूचित जमातीच्या
दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी. दारिद्रय रेषेखालील असल्यास यादीतील अनुक्रमांक
नमुद असलेला ग्रामसेवकाचा दाखला जोडावा. पालकाच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल
रुपये एक लाख या मर्यादेत असावे. इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे
वय 5 वर्षे 8 महिने पूर्ण असावे. त्याचा जन्म 1 जानेवारी, 2012 ते 30 जानेवारी, 2013 दरम्यान झालेला
असावा. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याचे वैद्यकीय
प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार
नसावेत.
ज्या
पालकांना आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता पहिलीच्या
वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, यावल जि. जळगाव येथे पाल्याचा जन्म दाखला व आधार कार्डची सांक्षाकित प्रत
सादर केल्यानंतर 1 फेब्रुवारी, ते 3 मार्च, 2018 या कालावधीत प्रवेश अर्ज
विनामुल्य प्राप्त होतील. परीपूर्ण भरलेला अर्ज 10 मार्च, 2018 पूर्वी जमा करावा.
इयत्ता पहिली व दुसरीच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी
करण्यासाठी चोपडा, अमळनेर, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुक्यामधील पालंकानी व
पाल्यांनी बालमोहन विद्यालय, शिवकॉलनी, शिरपुर रोड, चोपडा येथे तर रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड,
भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, भडगांव तालुक्यामधील पालकांनी व पाल्यांनी शासकीय
आश्रमशाळा, डोंगरकठोरा, ता. यावल येथे 15 मार्च, 2018 रोजी उपस्थित राहावे. असे
आवाहन श्री. हिवाळे, प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment