Monday, 15 January 2018

अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा. -जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर



          

       जिमाका-जळगाव, दि. १५:- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास संबंधित विभागाने तातडीने पूर्ण करावा. अशी सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली.
        जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस अपर पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, जिल्हा सरकारी वकील ॲङ केतन ढाके, सहायक आयुक्त, समाज कल्याण खुशाल गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, सुनिल अहिरे, कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प, पी. सी. शिरसाठ, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल आदिंसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
        अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत डिसेंबर 2017 अखेर  19 प्रकरणे पोलीस तपासावर होती. त्यातील 6 गुन्ह्यांची निर्गती झाली असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. या अधिनियमाखाली  डिसेंबर 2017 अखेर दाखल 45 अत्याचार पिडीतांना 37 लाख 50 हजार 750 रुपये अर्थसहाय मंजूर करण्यात आले आहे. अशी माहिती श्री. गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी बैठकीत दिली.
000

No comments:

Post a Comment