Friday, 12 January 2018

जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



            जळगाव, दि. 12 - जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
            जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी प्रतिमा पुजन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, जिल्हा करमणुक कर अधिकारी महेश चौधरी, तहसीलदार अमोल निकम यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment